रेल्वेतील स्टंटबाजी जीवावर बेतली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वेतील स्टंटबाजी जीवावर बेतली

Share This
ठाणे : रेल्वेमध्ये स्टंटबाजी करणार्‍या १४ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे रेल्वेत स्टंटबाजी करणे हे किती महागात पडू शकते, हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या मुलाचे नाव मोहसीन असून या घटनेने त्याच्या परिवाराला मोठा धक्का बसला आहे, मात्र अशा प्रकारे रेल्वेमध्ये स्टंटबाजी कोणी करू नये. जी घटना आपल्या कुटुंबासोबत झाली ती इतर कोणाबरोबर होऊ नये, यासाठी मुलांच्या पालकांनीही लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मोहसीनच्या वडिलांनी सांगितल. काही दिवसांपूर्वीच स्टंटबाजी करताना मोहसीनचा मृत्यू झाला होता. त्या घटनेचा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. सय्यद हुसेन रजा हे मुंब्रा येथे राहतात. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी, अशी चार मुले आहेत. पत्नीचा मृत्यू झाल्याने सय्यद हुसेन हेच मुलांचा सांभाळ करतात. त्यातील मोहसीन हा त्यांचा सर्वात लहान १४ वर्षीय मुलगा काही खरेदी करण्यासाठी रेल्वेने ठाण्याच्या कोरम मॉल येथे आला होता. त्यानंतर घरी जाण्यासाठी त्याने ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रेन पकडली, मात्र त्याने ट्रेनमध्ये स्टंटबाजी सुरू केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages