मुंबई - महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीला मंजुरी दिल्यामुळे 1087 कोटी 94 लाख रुपये इतकी भर बेस्टच्या उत्पन्नात पडली आहे. त्यामुळे उपक्रमाच्या विद्युत उपक्रमाला 125 कोटी रुपये नफा झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने गुरुवारी बेस्ट समितीत दिली.
|
बेस्ट आर्थिक संकटात आहे. त्या संकटातून उपक्रमाला बाहेर काढण्यासाठी वीज दरवाढ आणि बेस्टच्या भाड्यात वाढ हे पर्याय बेस्टकडे होते. बेस्ट प्रशासनाने वीज नियामक आयोगाला वीज दरवाढीबाबतचा प्रस्ताव पाठविला होता. आयोगाने दरवाढीच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली. त्यामुळे बेस्टला चांगलाच दिलासा मिळाला आहे. बेस्टचा विद्युत विभाग सध्या 456 कोटी रुपये तुटीत आहे. ही तूट दूर करण्यासाठी आता वीज दरवाढ फायदेशीर ठरणार आहे. आयोगाने वीज दरवाढीला मंजुरी दिल्यामुळे बेस्टला 3716.88 कोटी रुपये इतके उत्पन्न मिळणार आहे. दरवाढीचा फायदा बेस्टला चांगलाच होऊ लागला आहे.

No comments:
Post a Comment