आम आदमी पार्टीच्या अंजली दमानियावर दंगलीचा गुन्हा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आम आदमी पार्टीच्या अंजली दमानियावर दंगलीचा गुन्हा

Share This
मुंबई - वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी "आम आदमी पार्टी'च्या संघटक अंजली दमानियावर खेरवाडी पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमाराला दमानियाबरोबर पक्षाचे कार्यकर्ते आणि विक्रोळी, मुलुंड आणि गोरेगाव या ठिकाणच्या म्हाडा ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवासी वांद्रे येथील म्हाडा कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडून आत घुसले होते. 

शहरातील म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमधील विविध समस्यांबाबत म्हाडा अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गुरुवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी कार्यालयाच्या गेट क्रमांक पाचमधून दमानियाबरोबर दोनशे जणांच्या जमावाने कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या वेळी दोन महिला पोलिसांसह एकूण तीन पोलिस कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत हा मोर्चा म्हाडा कार्यालयात ठाण मांडून होता. या प्रकरणी अंजली दमानियासह दोन कार्यकर्ते आणि 200 जणांवर दंगलीचा गुन्हा नोंदविल्याची माहिती खेरवाडी पोलिसांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages