मुंबई - वीज बचतीची सुरुवात पालिकेची सर्व रुग्णालये; तसेच मुख्यालयातून करण्यात येणार आहे. यासाठी एक कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. पालिका कार्यालयातील जुनाट यंत्रांमुळे विजेची मोठी तूट भासत होती. त्याचा आर्थिक भुर्दंड पालिकेला सोसावा लागत होता. त्यामुळे विजेचे ऑडिट करण्यात आले.
पहिल्या टप्प्यात रुग्णालयातील विजेचे ऑडिट करण्यासाठी सल्लागार नेमण्यात आला होता. यातील शिफारशीनुसार रुग्णालयात एसी प्लॅन्ट, हिटर आणि रोषणाईची उपकरणे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सायन हॉस्पिटलमधील रोषणाईची उपकरणे बदलण्यात आली, तर केईएम रुग्णालयात अद्ययावत एसी प्लॅन्ट बसविण्यात आल्याचे महापालिकेचे उपप्रमुख अभियंता गु. सु. शरीफ यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागातील एसीच्या साह्याने शस्त्रक्रियेसाठी; तसेच इतर कामांसाठी लागणारे पाणी तापविण्यात येणार आहे. या यंत्रातील "हीट रिकव्हरी' करून त्यावर पाणी तापविले जाईल. कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात सौरऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे.
एसी प्लान्टसाठी 70 टक्के वीज
रोषणाईसाठी 20 टक्के
हीटरसाठी 10 टक्के

No comments:
Post a Comment