वातानुकूलित बसेसच्या मार्गात १ नोव्हेंबरपासून बदल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वातानुकूलित बसेसच्या मार्गात १ नोव्हेंबरपासून बदल

Share This
मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या एसी बसेसच्या मार्गात येत्या १ नोव्हेंबरपासून काही बदल करण्यात येणार आहेत. १ नोव्हेंबरपासून एसी बसेसचे दोन नवीन मार्ग सुरू करण्यात येणार असून, दोन मार्गावरील एसी बसेसच्या फेर्‍यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. तीन एसी बस मार्ग बंद करण्यात येणार आहे. पाच एसी बसेसच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. ए-७0जलद मीरा रोड ते मंत्रालय, एस-४५८ चारकोप ते मुलुंड डेपो (व्हाया घोडबंदर रोड), एस ५0५ वांद्रे डेपो ते वाशी बस स्थानक हे तीन एसी बस मार्ग बंद करण्यात येणार आहेत. एस-६ महेश्‍वरी उद्यान ते बॅकबे डेपो (व्हाया लालबाग) आणि एस-७ महेश्‍वरी उद्यान ते बॅकबे डेपो (व्हाया हाजी अली) या मार्गावर दोन नवीन एसी बसेस चालवण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, तर एस-२ मीरा रोड ते नेहरूतारांगण आणि एस-७00 बोरिवली ते ठाणे या एसी बसेसच्या फेर्‍यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.तसेच ए-१३ जलद, ए-७४, ए-७५ जलद, ए-७६ आणि एस-५९२ या एसी बसेसच्या मार्गात बदल करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages