अग्निशमन दलाच्या कारभाराचा शाळांच्या पुनर्विकासाला फटका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अग्निशमन दलाच्या कारभाराचा शाळांच्या पुनर्विकासाला फटका

Share This
मुंबई - अग्निशमन दलाच्या वेळकाढूपणामुळे पालिकेच्या 18 शाळांचा पुनर्विकास रखडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या शाळांच्या पुनर्विकासाची फाईल कार्यालयात धुळखात पडली आहे. शिक्षण विभागाने 2010 मध्ये शाळांच्या पुनर्विकासाला ना हरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून अग्निशमन दलाकडे अर्ज केला होता. मात्र, अद्याप या शाळांना ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही. अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र मिळाल्यास शाळादुरुस्तीचे काम तत्काळ सुरू होऊ शकते. मात्र, दोन वर्षांपासून एकही वीट रचण्यात आलेली नाही. शाळांच्या दुरुस्तीसाठी पालिकेने मोहीम आखली आहे. एका बाजूला शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी आकाशपाताळ एक करायचे तर दुसऱ्या बाजूला पालिकेच्याच दुसऱ्या विभागाकडून शाळांच्या दुरुस्तीत खो घातला जात आहे. यावरून येत्या शिक्षण समितीच्या बैठकीत वादळी चर्चा सुरू होण्याची शक्‍यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages