पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागातील १०५३१ फायली गहाळ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागातील १०५३१ फायली गहाळ

Share This
४० हजार फायलींचे स्क्यानिंग अद्याप बाकी 
मुंबई / http://jpnnews.webs.com (News Website)
मुंबई महानगर पालिकेतील इमारत प्रस्ताव विभागातील १९१९ पूर्वीच्या ९१४९ तर १९९१ नंतरच्या १३८२ अशा १०५३१ फायली गहाळ झाल्या आहेत. १९९१ पूर्वीच्या ८७ तर १९९१ नंतरच्या १३ टक्के फायली उपलब्ध नसल्याचे समजते. पालिकेमधील इमारत प्रस्ताव विभागातील अद्याप ४० हजार फायलींचे स्क्यानिंग बाकी असल्याचे माहिती अधिकारा मधून मागवलेल्या माहिती मधून उघड झाले आहे. 

विधान परिषदे मध्ये चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, भगवान साळुंखे या सदस्यांनी पालिकेतील गहाळ फायलीबाबत तारांकित प्रश्न (क्रमांक ४४२८३)विचारला होता या प्रश्नाच्या अनुषंगाने राज्य सरकारने पालिकेमधील हरवलेल्या फायली बाबतची माहिती पालिकेच्या आयुक्तांकडून मागवलेली होती. विधान परिषदेला पालिकेने कोणती माहिती दिली याची कागदपत्रांसह सर्व माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी पालिकेकडून मागिवली होती. 

पालिकेने दिलेल्या माहिती नुसार उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव)शहरे यांच्या कार्यालयातील १९९१ पूर्वीच्या १०९५, ११९१ नंतरच्या २७९, उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव)पूर्व उपनगरे यांच्या कार्यालयातील १९९१ पूर्वीच्या ३७४०, १९९१ नंतरच्या ५४२, उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव)पश्चिम उपनगरे एक यांच्या कार्यालयातील १९९१ पूर्वीच्या ३१६४,१९९१ नंतरच्या ३१०, तर उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव)पश्चिम उपनगरे दोन यांच्या कार्यालयातील १९९१ पूर्वीच्या ११५०, १९९१ नंतरच्या २५१ अशा एकूण १०५३१ फायली हरवल्या असल्याचे पालेकेने सांगितले आहे. 

पालिकेने अद्याप शहर विभागातील ४०९६८, पूर्व उपनगरातील २२३६६,पश्चिम उपनगरे एक विभागातील ३८४०३, पश्चिम उपनगरे दोन विभागातील २९८९८ अशा एकूण १ लाख ३१ हजार ६३५ फायलींचे स्क्यानिंग झाले असून अद्याप अंदाजे ४० हजार फायलींचे स्क्यानिग बाकी असल्याचे पालिकेने सांगितले आहे.  

पालिकेमधील फायलीं गहाळ होण्याबाबत पालिकेने नियमित पर्यवेक्षण ओडीट न होणे, अभिलेख कक्षात आवश्यक कर्मचारी नसणे, कार्यालयाच्या स्थालान्तारावेली योग्य नांदी न ठेवणे, अभिलेखासाठी पुरेशा जागेचा अभाव, इतर फायली मध्ये फायली मिसळणे, अभिलेखाची संबंधित नोंदणी पुस्तकात अद्ययावत नोंद नसणे, पावसामुळे वाळवीमुळे वयोमानामुळे फायली खराब होणे, अभिलेख कक्षात फायली व्यवस्थितरित्या न ठेवणे, कर्मचाऱ्यांच्या बदालीच्या वेळी फायलींचे फायलींचे हस्तांतरण न होणे अशी करणे देण्यात आली आहे यामुळे या फायली हरवण्याला सर्वस्वी पाने पालिकेचे अधिकारी कर्मचारी दोषी असल्याचे सिद्ध होत आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages