बेस्ट उपक्रमाचा तोटा घटला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट उपक्रमाचा तोटा घटला

Share This
मुंबई : आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्ट उपक्रमाचा तोटा काही अंशी घटला आहे. आर्थिक वर्ष २0११-१२ या काळात बेस्टला ८४७ कोटी रुपयांचा तोटा झाला होता,मात्र तूट भरून काढण्यासाठी उपक्रमाने राबवलेल्या विविध उपाययोजनांचे परिणाम दिसून आले असून आर्थिक वर्ष २0१२-१३ मध्ये तोटा ५0८ कोटींवर आला आहे.

उपक्रमाने बेस्ट समितीमध्ये सादर केलेल्या ताळेबंदमध्ये विद्युत विभाग वर्ष २0११-१२ मध्ये ४५६.0३ कोटीने तोट्यात गेला होता, मात्र उपाययोजनांमुळे उपक्रमाला १२५.४२ कोटी रुपयांचा फायदा झाला होता, मात्र परिवहन विभागाचा तोटा या काळात ३९१.७३ कोटीवरून ६३३.५0 कोटींपर्यंत पोहचला आहे. म्हणजे बेस्ट उपक्रम ८४७.७६ कोटीने तोट्यात गेला आहे. इंधनाचे वाढते दर, कच्चा माल आणि घसरण यामुळे तूट होत आहे. याशिवाय काही बसमार्ग विविध विकासकामांमुळे वळवण्यात आल्यामुळे उपक्रमाचा तोटा वाढत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages