‘प्रजा’च्या प्रगतीपुस्तकाचे प्रकाशन / सर्व पक्षीय बडे नगरसेवक नापास - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘प्रजा’च्या प्रगतीपुस्तकाचे प्रकाशन / सर्व पक्षीय बडे नगरसेवक नापास

Share This

प्रजा फाऊंडेशनने नगरसेवकांच्या एक वर्षाच्या कामकाजाचे मुल्यमापन करणारा अहवाल मंगळवारी  प्रसिद्ध केला या अहवालात पलिकेतील सर्वपक्षीय बडे नगरसवक नापास ठरले असून प्रथमच निवडूनआलेले नगरसेवक भरघोस गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत 


या अहवालात शिवसेनेच्या वरळीतील नगरसेविका हेमांगीवरळीकर यांना प्रजा ने प्रथम क्रमांक बहालकेला आहे पहिल्या दहा नगरसेवकांमध्ये भाजपच्या मनिषा चौधरी ,  सभागृह नेते शैलेश फणसे ,शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यामिनी जाधव वर्षा टेंबवलकर ,  नौशिर मेहता डॉ अनुराधापेडणेकर समाजवादी पक्षाचे याकुब मेमन आणि काँग्रेसच्या जंता यादव यांचा समावेश आहे .यातील सर्वाधिक सात नगरसेवक शिवसेनेचे आहेत 

राजकीय पक्षांचे पालिकेतील गटनेते प्रजा च्या क्रमवारीत पिछाडीवर आहेत विरोधी पक्षनेते्ञानराज निकम यांना ५३ मनसेचे दिलीप लांडे ४० राष्ट्रवादीचे धनंजय पिसाळ ३१ भाजपचे दिलीप पटेल १८ तर समाजवादी पक्षाचे रईस शेख हे १५२ व्या क्रमांकावर आहेत .  सुधार समितीचे अध्यक्ष डॉ राम बारोट ३८ व्या शिक्षण समितीचे अध्यक्ष मनोज कोटक ५६ उपमहापौर मोहन मिठबांवकर ५० क्रमांकावर ढकलण्यात आले आहे .  विशेष म्हणजे हे सर्व गटनेते सभागृह आणि स्थायी समितीच्या बैठकांमध्ये चर्चांमध्ये आघाडीवर असतात त्यांनाच प्रजाने नापास केले आहे 

प्रजाने माहितीच्या अधिकाराखाली तसेच २४ हजार ५९४ नागरिकांच्या मतांवर  आधारीत हे सर्वेक्षण केले नगरसेवकांचे शिक्षण गुन्हेगारी पार्श्वभूमी पालिकेत िचारलेले प्रश्न या आधारे हा अहवाल तयार करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नीताई मेहता यांनी दिली पालिकेचे सभागृह ,समित्यांमध्ये जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवून प्रशासनाला जाब विचारण्याचा अधिकार नगरसेवकांना आहे मात्र असंख्य नगरसेवक  अधिकाराचा वापर करत नसल्याचा ठपका प्रजाने ठेवला आहे वर्षभरात एका नगरसेवकाने ५०हून अधिक प्रश्न विचारले तर १३ नगरसेवकांनी सभागृहात एकदाही तोंड घडलेले नाही ,  असे अहवालात म्हटले आहे ३१ डिसेंबर २०१२पर्यंत ३५ नगरसेवकांवर विविध गुन्ह्यांची  आराेपपत्रे पोलिसस्टेशन मध्ये दाखल झाली आहेत नगरसेवक म्हणून एक वर्ष पूर्ण होण्याआधीच १८ जणांवर एफआयआर दाखल झाला आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages