पालिका मुख्यालयाच्या सुरक्षेबाबत सत्ताधारी आणि प्रशासनाचा खेळ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका मुख्यालयाच्या सुरक्षेबाबत सत्ताधारी आणि प्रशासनाचा खेळ

Share This


सुरक्षेसाठी बॉम्ब व बंदुका शोधू न शकणाऱ्या स्क्यानर मशीन, मेटल डिटेक्टर
मुंबई - अजेयकुमार जाधव / http://jpnnews.webs.com ( NEWS website )
मुंबई महानगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे असलेल्या मुख्यालयात मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी भेट देवून पालिकेची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ असल्याचे उघड केले आहे. पालिकेमध्ये भेट देणाऱ्या लोकांचे सामान तपासण्यासाठी बसवण्यात आलेल्या स्क्यानर मशीन मध्ये बॉम्ब किवा बंदुका पकडल्याच जाऊ शकत नाहीत या मशीन काहीही कामाच्या नसल्याचे दहशतवाद विरोधी पथकामधील अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने दिली आहे. 

मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयात मुंबईचे महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, विविध पक्षांचे गटनेते, नगरसेवक यांची कार्यालये आहेत या कार्यालयामध्ये दर दिवशी तीन ते चार हजार लोक भेट देत असतात. परदेशातील शीष्टमंडळे सुद्धा पालिकेच्या मुख्यालयात येत असतात यामुळे पालिकेची सुरक्षा कडक करण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनाने मुख्यालयाच्या चारही प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर, आणि स्क्यानर मशीन बसवल्या आहेत. गेले कित्तेक वर्षे या मशीन मधून मुख्यालयामध्ये येणाऱ्या लोकांचे सामान तपासून आमची सुरक्षा किती कडक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

परंतू नुकतीच पालिकेच्या मुख्यालयामध्ये दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी सुरक्षा विभागाला कोणतीही माहिती न देता बॉम्ब आणि बंदूक घेवून प्रवेश केला होता. या पोलिसांची सर्व मुख्यालय फिरताना कोणीही चौकशी केली नसल्याने पोलिसांनी आयुक्तांच्या दालनात प्रवेश करून आयुक्तांच्या टेबलावर बॉम्ब आणि बंदुक ठेवून सुरक्षा किती ढिसाळ आहे हे दाखवून दिले होते. यानंतर पालिकेच्या सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांशी सुरक्षेबाबत बोलताना मुख्यालायामधील स्क्यानर मशीन मध्ये बॉम्ब पकडलेच जाऊ शकत नाहीत, तसेच काही मेटल डिटेक्टर निकामी झाले असल्याने या डिटेक्टर मध्ये बंदुका पकडल्याच जाऊ शकत नाही असे या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. 

मंत्रालयामध्ये लावलेल्या स्क्यानर मशीनमध्ये सामनामध्ये कोणी कितीही बॉम्ब लपवून आणण्याचा प्रयत्न केला तरी मशीन बॉम्ब असल्याचे त्वरित सुरक्षा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देते. परंतू पालिका मुख्यालायामधील स्क्यानर मशीनमध्ये एखाद्याने सामनामध्ये बॉम्ब लपवून आणल्यास वर वर असलेले सामान तेवढे दिसते आतील बॉम्ब दिसू शकत नाही तसेच बॉम्ब एखाद्या वस्तू मध्ये लपवून आणल्यास या मशीन बॉम्ब असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूच शकत नसल्याचे सांगण्यात आल्याचे या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले आहे. 

यामुळे पालिका प्रशासनाने व सत्ताधारी यांनी संगनमताने करोडो रुपये खर्च करून पालिकेच्या मुख्यालयामध्ये चारही प्रवेश द्वारावर बसवलेल्या स्क्यानर मशीन काहीही कामाच्याच नसल्याचे उघड झाले आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाने पालिकेच्या मुख्यालयाच्या सुरक्षेचा विचार करण्यापेक्षा आपल्या कमिशनचा जास्त विचार केल्याची चर्चा सध्या पालिकेच्या मुख्यालयामध्ये दबक्या आवाजात होऊ लागली आहे. पालिकेमधील बॉम्ब शोधू न शकणाऱ्या स्क्यानर मशीन तसेच निकामी झालेले मेटल डिटेक्टर त्वरित बदलून पालिकेची सुरक्षा कडक करावी अशी मागणी केली जात आहे. 

जगामध्ये आतंकवाद फैलावत आहे अशावेळी सुरक्षा चोख असणे हि काळाची गरज आहे. पालिकेमध्ये बॉम्ब शोधूच शकत नाहीत अश्या स्क्यानर मशीन व निकामी झालेले मेटल डिटेक्टर असल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने निदर्शनास आणले असल्याने सत्ताधारी आणि प्रशासनाने या मशीनवर उगाचच करोडो रुपये खर्च केले असल्याचे समोर आले आहे. यामुळे या सर्व स्क्यानर मशीन व मेटल डिटेक्टर नवीन बसवून पालिकेची सुरक्षा कडक करण्याबाबत पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र देणार आहे. येत्या पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत स्क्यानर मशीन व मेटल डिटेक्टर   बाबत चर्चा करणार आहे.

- ज्ञानराज निकम (विरोधी पक्ष नेते, मुंबई महानगरपालिका)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages