ओव्हल मैदान ते विरार एलिव्हेटेड प्रकल्पावर प्रश्नचिन्ह - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ओव्हल मैदान ते विरार एलिव्हेटेड प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

Share This
मुंबई : ओव्हल मैदान ते विरार या २५ हजार कोटी रुपयांच्या एलिव्हेटेड प्रकल्पाच्या भवितव्यावर निधीवरूनच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकल्पासाठी अद्यापि रेल्वे मंत्रालयाशी राज्य सहकार्य करार झालेला नाही. त्यातच प्रकल्प खाजगी आणि सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर राबवण्याचाही विचार सुरू आहे. त्यामुळे प्रकल्प सुरू होण्याअगोदरच अडथळे निर्माण झाले आहेत. पश्‍चिम रेल्वेवरील गर्दी पाहता आगामी काळात ओव्हल मैदान ते विरार असा एलिव्हेटेड प्रकल्प उभारण्याचा रेल्वेचा मानस आहे. एलिव्हेटेड आणि भूमिगत असा हा मार्ग असणार आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च पाहता हा प्रकल्प सुरू होण्याअगोदरच रेंगाळला आहे. त्यामुळे खाजगी आणि सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र खाजगी आणि सार्वजनिक तत्त्वावरील प्रकल्पांमध्ये तफावत निधीची समस्या निर्माण होते. प्रकल्पात सहभागी होणार्‍या कंपन्या तफावत निधीविषयी आग्रही होतात. परिणाम स्वरूप प्रकल्पाचा खर्च वाढत असल्याचे दिसून आले आहे. प्रकल्प पूर्ण होण्याचे लक्ष्य २0२0 ठेवण्यात आले आहे, मात्र अद्यापि प्रकल्पाचा नारळ फुटला नाही. त्यामुळे प्रकल्प सुरू होऊन तो कधी पूर्ण होईल हे सांगणे कठीण होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages