प.रे.वरील अतिरिक्त मार्गाचा व सिग्नल यंत्रणेचा खर्च वाढला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प.रे.वरील अतिरिक्त मार्गाचा व सिग्नल यंत्रणेचा खर्च वाढला

Share This
मुंबई : पश्‍चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते बोरिवली या अतिरिक्त पाचव्या आाणि सहाव्या मार्गाचा खर्च दुपटीने वाढला आहे. या मार्गासाठी २00७ मध्ये ५२२ कोटी रुपये अंदाजित खर्च दाखवण्यात आला होता. मात्र आता हा खर्च वाढून १0४९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पश्‍चिम रेल्वेवरील सिग्नल यंत्रणेचा मूळ खर्च ३७ कोटी रुपयांपर्यंत अपेक्षित होता. प्राथमिक स्तरावर रुट रिले इंटरलॉकिंग एक होता. मात्र यंत्रणेच्या आधुनिकतेची गरज लक्षात घेता रुट रिले इंटरलॉकिंगची संख्या सहापर्यंत पोहोचली आहे. परेचे लाचखोर महाव्यवस्थापक महेश कुमार यांच्या काळात हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे ३७ कोटींवरून २२0 कोटींपर्यंत पोहोचलेल्या प्रकल्पाच्या खर्चावर संशयाचे ढग निर्माण झाले आहेत

मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पअंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान पाचवा आणि सहावा मार्ग उभारण्यात येणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर धिम्या, जलद आणि मेल/ एक्स्प्रेक्ससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार आहेत. या मार्गामुळे उपनगरी रेल्वेच्या प्रवासी वाहून नेण्याच्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक वाढण्याची क्षमता ही वाढणार आहे. जागतिक बॅँक, रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रकल्प राबवण्यात येणार आहे. प्रकल्पाचा खर्च दुपटीने वाढल्यामुळे संबंधितांकडून त्यास विरोध होत आहे. रेल्वे बोर्डाने पश्‍चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबतचा जाब विचारला आहे. त्यानुसार मुंबई रेल्वे विकास महामंडळ लवकरच याबाबतचा नवा खर्च अहवाल सादर करणार असल्याचे समजते. मध्य रेल्वेवर सीएसटी ते कुर्ला असा पाचवा आणि सहावा मार्ग उभारण्यात येणार आहे. या मार्गाचा खर्च ६५९ कोटी रुपयांवरून ९२५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. परेवर प्रकल्पाचा खर्च दुपटीने वाढला असताना मध्य रेल्वेवरील खर्चाची वाढ योग्य असून यावर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेण्यात आला नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages