धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करू - पवार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करू - पवार

Share This
अहमदनगर : धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार असून, याप्रश्नी दिल्लीत यावर चर्चा करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त जामखेड तालुक्यातील चौंडी येथे झालेल्या कार्यक्रमात मंत्री पवार बोलत होते. त्यांच्या हस्ते अहिल्या शिल्पसृष्टीचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी पवार म्हणाले, १९९0 च्या सुमारास धनगर समाजास सुरुवातीला ओबीसींच्या सवलती दिल्या होत्या. त्यानंतर भटक्या विमुक्त जाती वर्गाच्या सवलती दिल्या. आजचे प्रचलित कायदे आणि अस्तित्वात असलेल्या अन्य जातींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. आदिवासींच्या सवलती कायम ठेवून धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात दिल्लीला अण्णा डांगे यांनी आल्यास आपण याबाबतचा निर्णय घेण्यास भाग पाडू, असे त्यांनी सांगितले. अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करताना पवार म्हणाले, दोनशे वर्षांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीत उत्तम राज्य कारभार करण्याचे अहिल्यादेवी एक उत्तम उदाहरण आहे. त्या काळात समाजोपयोगी कामे करतानाच जनतेसाठी विहीर, घाट, रस्ते बांधण्याची दूरदृष्टी आणि जनतेसाठी अन्नछत्र अशी कामे विशेषत्वाने उल्लेख करावी लागणारी आहेत.

छगन भुजबळ म्हणाले, चौंडी विकासासाठी पर्यटन विकास महामंडळामार्फत व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चौंडी विकासासाठी ४0 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, यापैकी गढीच्या नूतनीकरणासाठी २ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यापुढील काळात टप्प्याटप्प्याने निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages