गरीब विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण धोक्यात - रमेश जोशी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गरीब विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण धोक्यात - रमेश जोशी

Share This
मुंबई : देशातील कोट्यवधी मुलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवून देणारा शिक्षण हक्क कायदा देशभर लागू झाला;परंतु या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याऐवजी ती होऊच नये यासाठी राज्य व देशपातळीवर काही शिक्षण सम्राट राज्यकर्ते आणि प्रशासनाला हाताशी धरून प्रय▪करत आहेत.राज्यात शिक्षण हक्क कायदा बासनात गुंडाळून गरीब विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणाचे दरवाजे बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शिक्षक सभेचे नेते आणि केंद्रीय नियोजन आयोगाचे सल्लागार रमेश जोशी यांनी केला.

बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक विभागाच्या सर्वभाषिक शाळांतील शिक्षकांचे नेतृत्व करणार्‍या शिक्षक सभेतर्फे शिक्षक दिनानिमित्त शिवाजी मंदिर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जोशी यांनी शिक्षण हक्क कायद्याच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. शिक्षण हक्क कायद्याविषयी भ्रामक समजुती पसरवतानाच सरकारी शाळांतील शिक्षण कसे कुचकामी, दर्जाहीन आहे, असा हेतुपुरस्सर प्रचार राज्य आणि प्रशासनकर्ते करत आहेत. त्यांना कोणत्याही स्थितीत गरीब विद्यार्थ्यांच्या असलेल्या शाळा बंद करून शिक्षण सम्राटांचे खिसे भरावयाचे आहेत.परंतु शिक्षक सभा असेपर्यंत त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती जोशी यांनी दिली. त्यासाठी शिक्षकांनी या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी डोळ्यात तेल घालून सजग राहावे, असे आवाहन या वेळी जोशी यांनी केले. कार्यक्रमाला म्युनिसिपल कर्मचारी महासंघाचे नेते दिवाकर दळवी, सभेचे कोषाध्यक्ष सुरेश गावडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages