मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाइन आणि हार्बर मार्गावर रविवार, ८ सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर, हार्बर मार्गावर सीएसटी ते कुर्लादरम्यान डाऊन मार्गावर आणि वडाळा रोड ते वांद्रेदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
मेन लाइनवर मुलुंड ते माटुंगादरम्यान अप धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३.३0 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान मुलुंड ते माटुंगादरम्यानची अप धिम्या मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसटीला लोकल गाड्या सुमारे २0 मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत. त्यामुळे सीएसटीला येणार्या आणि जाणार्या सर्व लोकल सकाळी ११ ते संध्याकाळी ४ या वेळेत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावणार आहे. हार्बर मार्गावर सीएसटी ते कुर्ला स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावर सकाळी १0.५२ ते ३.१३ वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान सीएसटीहून सुटणार्या वाशी-बेलापूर-पनवेल लोकल गाड्या कुर्ला स्थानकांपर्यंत मेन लाइनने चालविण्यात येणार आहे, त्यानंतर हार्बर मार्गाने गाड्या चालविण्यात येणार आहेत. दरम्यान, या गाड्या चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर थांबणार नाहीत. तसेच सीएसटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी १0.४0 ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक सकाळी ११ ते दुपारी ४ वाजून ३0 मिनिटांपर्यंत १५ ते २0 मिनिटे उशिराने धावणार आहे. वांद्रे-अंधेरी मार्गावरील प्रवासी सकाळी १0 ते दुपारी ५ वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करू शकतात, असे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. तसेच ब्लॉक काळामध्ये गाड्यांना प्रचंड गर्दी होते, अशा वेळी प्रवाशांनी जास्त गर्दी झालेल्या लोकलमधून प्रवास करू नये, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

No comments:
Post a Comment