मुंबई - ‘आम आदमी’ पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या नावाखाली आज म्हाडा मुख्यालयात अक्षरश: हैदोस घातला. मुख्यालयात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करणार्या कार्यकर्त्यांना अडविणार्या महिला पोलिसांवर या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. इतक्यावरच न थांबता बेभान झालेल्या या कार्यकर्त्यांनी महिला पोलिसांच्या वर्दीवर हात टाकून ती फाडून टाकली आणि त्यांचे गळेही दाबले. अंजली दमानिया आणि मयांक गांधी यांच्या इशार्यावरून चाललेल्या या गुंडागर्दीत दोन महिला पोलीस आणि एक व्यक्ती जखमी झाली आहे.
दमानिया आणि गांधी यांच्या पुढाकाराखाली आम आदमी पार्टीचा मोर्चा म्हाडा कार्यालयावर आला. संक्रमण शिबिरातील बेकायदेशीर रहिवाशांना नियमित करावे या मागणीसाठी हा मोर्चा होता. मात्र हा धोरणात्मक निर्णय असल्याचे अधिकार्यांनी सांगून शिष्टमंडळाला बैठकीस बोलावले. मात्र सगळ्या आंदोलकांना आत घ्या असा आरडाओरडा करीत धांगडधिंगा घातला. त्यांना महिला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करताच महिला आंदोलकांनी पोलिसांना नखांनी ओरबाडले. इतक्यातच न थांबता त्यांनी महिला पोलिसांची वर्दी फाडली, त्यांचे गळेही आवळले. मारहाण ही करण्यात आली. तब्बल तीन तास हा हंगामा सुरू होता. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या धांगडधिंग्यात तीन पोलीस जखमी झाल्याची माहिती खेरवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.
सायंकाळी पाचनंतर म्हाडा अधिकार्यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले, मात्र तिथेही दमानिया आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धांगडधिंगा घालीत अवास्तव मागण्या करून धरणे धरले. संध्याकाळी साडेसातनंतरही धरणे आंदोलन सुरूच ठेवून म्हाडा अधिकार्यांना वेठीस धरले.
50.
41

No comments:
Post a Comment