४५ हजार पोलिसांबरोबर १८ निमलष्करी दलाच्या तुकड्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

४५ हजार पोलिसांबरोबर १८ निमलष्करी दलाच्या तुकड्या

Share This
गणेशोत्सव व रविवारपासून सुरू झालेल्या' माऊंट मेरी'च्या जत्रेमुळे शहर पोलीस दलावर बंदोबस्ताचा मोठा ताण पडणार आहे. 'माऊंट मेरी'ची यात्रा पुढचा रविवार म्हणजे १५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या दोन्ही उत्सवांसाठी शहर पोलिसांनी विविध ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला असून त्यासाठी पोलिासांच्या साप्ताहिक सुट्टय़ांसमवेत सर्वच रजा बंद करण्यात आल्या आहेत. हे दोन्ही उत्सव निर्विघ्नपणे पार करण्यासाठी एकूण ४५ हजार पोलिसांच्या मदतीला १८ निमलष्करी दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली. या निमलष्करी तुकड्यांमध्ये राज्य राखीव, केंद्रीय औद्योगिक दल, केंद्रीय राखीव पोलीस दलांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages