गणेशभक्तांना पालिकेचे आवाहन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गणेशभक्तांना पालिकेचे आवाहन

Share This
मुंबई : बाप्पाचे विसर्जन करताना येणारी भरती आणि ओहोटीचे भान भाविकांनी ठेवावे, असे आवाहन मनपाने केले आहे.भक्तांनी विसर्जन दिनी पवित्र्य आणि मांगल्य जपावे तसेच उत्सवादरम्यान काय करावे आणि काय करू नये, अशा सूचना मनपाने केल्या आहेत.

हे करावे
गणेशोत्सव मंडळाचा परिसर स्वच्छ ठेवावा. मंडळाच्या जागेत आग विझवणारी उपकरणे ठेवावीत. निर्माल्यासाठी कापडी पिशवी ठेवावी. मंडप परिसरात ध्वनियंत्रणेद्वारे होणारे ध्वनी प्रदूषण टाळावे. देखावे पाहताना लहान मुलांची काळजी घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांना सहकार्य करावे.

हे करू नये 

गणेशमूर्ती विसर्जन करताना पाण्यात होणारे प्रदूषण टाळावे. मंडपाच्या जागेत ज्वलनशील वस्तूंचा संग्रह करू नये. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये. सजावटीसाठी थर्मोकोलचा वापर करू नये, विसर्जन दिनी मद्यपान करू नये. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री अथवा सेवन मंडपाच्या आवारात करू नये, विसर्जनप्रसंगी भक्तांनी खोल पाण्यात जाऊ नये.
भरती आणि ओहोटीचे वेळापत्रक
दिनांक भरतीची वेळ लाटांची उंची

१0 सप्टें. मध्यरात्री 0२.४९ 0४.१७ मी. 
१0 सप्टें. दुपारी 0३.00 0४.0२ मी. 
१३ सप्टें. पहाटे 0५.५0 0३.५३ मी. 
१३ सप्टें. सायंकाळी 0५.२४ 0३.२४ मी. 
१५ सप्टें. सकाळी 0८.३३ 0३.६१ मी. 
१५ सप्टें. रात्री 0८.४४ 0३.३0 मी. 
१८ सप्टें. सकाळी ११.१५ 0४.४५ मी. 
१८ सप्टें. रात्री ११.४५ 0४.३६ मी. 
१९ सप्टें. सकाळी ११.५५ 0४.५७ मी. 
दिनांक ओहोटीची वेळ उंची
१0 सप्टें. सकाळी 0८.३८ 0१.३४ मी.
१0 सप्टें. रात्री 0९.0६ 00.६७ मी.
१३ सप्टें. सकाळी ११.४८ 0२.१६ मी.
१५ सप्टें. मध्यरात्री 0१.३१ 0१.२८ मी.
१५ सप्टें. दुपारी 0२.५५ 0१.९0 मी.
१८ सप्टें. पहाटे 0४.४२ 00.७७ मी.
१९ सप्टें. पहाटे 0५.३0 00.६९ मी.
१९ सप्टें. सायं. 0६.0६ 00.५४ मी

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages