रिपाइं कार्यकर्त्यांवरील गुन्हे रद्द करावे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रिपाइं कार्यकर्त्यांवरील गुन्हे रद्द करावे

Share This
मुंबई : सामाजिक न्यायाच्या मागण्यांसाठी तसेच आंबेडकरी जनतेच्या अस्मितेच्या मागण्यांवर विविध ठिकाणी आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांवर नोंदवण्यात आलेले राजकीय स्वरूपाचे गुन्हे रद्द करण्यात यावे, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. आठवले यांनी या आणि इतर मागण्यांसंबंधी गुरुवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची मंत्रालयात भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

वरळी येथे अल्पवयीन मुलीचा जुलै महिन्यात बलात्कार केल्यानंतर खून झाला होता. या घटनेस दोन महिने उलटले तरी अद्यापही पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यास अपयश आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याकांडाची सीबीआयमार्फत सखोल चौकशी करावी, दलितांवर होणारे वाढते अत्याचार रोखण्यासाठी विशेष बैठक बोलवण्यात यावी, अशी मागणी आठवले यांनी निवेदनात केली आहे. या वेळी आठवले यांच्यासहित पूज्य दलाई लामा यांनी स्थापन केलेल्या तिबेटी पार्लमेंटच्या चार खासदारांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages