मुंबई - 30 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : परदेशात पी.एच.डी. करणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे यासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सुधारित शासनादेश जारी करण्यात आला आहे. या नव्या शासनादेशानुसार राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी असलेल्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची वार्षिक आर्थिक र्मयादा अडीच लाख रुपयांवरून तीन लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
भारतातील पदव्युत्तर पदवीचे काही अभ्यासक्रम उदाहरणार्थ एमएससी बाय रिसर्च वगळता इतर अभ्यासक्रमांमध्ये सर्वसाधारणपणे प्रबंध लिहिले जात नाहीत. त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना परदेशात पीएचडी अभ्यासक्रमास प्रवेश मिळत नाही. तसेच परदेशी शिष्यवृत्तीअंर्गत पीएचडीसाठीच्या काही जागा रिक्त राहतात. तसेच ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो त्यापैकी बर्याच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करता येत नाही. मात्र परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रबंध लिहावा लागतो. त्याचबरोबर वेगवेगळे रिसर्च/अँनालिसीस करून निष्कर्ष काढावे लागतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनाच पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्राधान्य दिले जाते. ही वस्तुस्थिती लक्षात घेता परदेशातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देणे क्रमप्राप्त आहे.परिणामी प्रचलित नियमावतील नियमांनुसार केवळ एकाच अपत्याला शिष्यवृत्तीचे लाभ मिळतात आणि पीएचडीसाठी पुरेसे विद्यार्थी प्राप्त होत नाही. या सर्व बाबींचा विचार करून भविष्यात या योजनेसाठी पुरेसे विद्यार्थी मिळावेत या हेतून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांंच्या शिष्यवृत्तीसाठी सुधारित नियमावली तयार करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment