20/1/2014
मुंबई : उपनगरी रेल्वेवर दिवसेंदिवस वाढणारी गर्दी आणि होणार्या विविध प्रकारच्या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या संख्येत पुरुष प्रवाशांची संख्या जास्त असली तरी महिला प्रवाशांची संख्याही वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच सर्वात चिंतेची बाब म्हणजे यातील सर्वात जास्त मृत्यू हे रूळ ओलांडताना होतात. त्यातच अशा अपघातात जखमी होणार्या महिलांची संख्याही वाढली आहे.
२0१३ मध्ये उपनगरी रेल्वे मार्गावर दोन हजार ७५४ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर दोन हजार ३६६ प्रवासी जखमी झालेले आहेत.वर्षभरात २७५४ प्रवाशांचा मृत्यूसर्वाधिक अपघातांची रेल्वे स्थानकेमध्य रेल्वेच्या मेनलाइनवर कुर्ला स्थानक, कांजूर मार्ग, नाहूर, ठाणे, मुंब्रा, कळवा रेती बंदर, घाटकोपर, दादर, डोंबिवली, कल्याण आणि दिवा रेल्वे स्थानकाजवळ, तर पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे, माहिम, माटुंगा रोड, दादर, अंधेरी, मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकांवर सर्वाधिक अपघात होतात. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर झालेल्या विविध अपघातांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. सकाळी ऑफिसला जाण्याच्या घाईगडबडीमध्ये असलेल्या महिला प्रवासी अनेकदा रेल्वे स्थानकावर येताना पादचारी पुलाचा वापर न करता रेल्वे रूळ ओलांडतात. त्या गडबडीत अनेकदा अपघात होतात.
गेल्या काही वर्षांत महिला प्रवाशांची वाढलेली संख्या आाणि त्या मानाने कमी असलेले डबे, यामुळे महिलांच्या डब्यात होणारी रेटारेटीदेखील महिलांच्या वाढत्या अपघाताला कारणीभूत असल्याचा दावा काही महिला प्रवासी करतात. रेल्वे अपघातात मृत होणार्या महिला प्रवाशांची वाढती संख्या ही एक चिंतेची बाब असल्यामुळे रेल्वे प्रशासन आाणि महिलांनी याकडे लक्ष द्यायला हवे, असे महिला प्रवासी सांगतात. त्याशिवाय काही रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची अजूनही कमी आहे. त्यामुळे जुन्या लोकल आणि नवीन लोकलमुळे ही उंची कमी-जास्त होते आणि त्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे गेल्या आठवड्यात उपनगरी मार्गावर झालेले तीन अपघात.
मध्य रेल्वे मार्गावर इगतपुरीपर्यंत एकूण १५६ रेल्वे स्थानकांवर ५५0 प्लॅटफॉर्म आहेत, तर पश्चिम रेल्वे मार्गावर ७८ प्ल्ॅाटफॉर्मपैकी ४६ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात आली आहे. लाइन क्रॉसिंग, धावत्या गाडीमधून पडून, खांबास धडकून, गॅपमध्ये पडून आणि इलेक्ट्रीक शॉक लागून झालेल्या अपघातांत मध्य रेल्वे मार्गावर एक हजार ५९७ तर पश्चिम रेल्वे मार्गावर ८९६ प्रवाशांनी जीव गमावला आहे. महिला प्रवाशांमध्ये मध्य रेल्वे मार्गावर १८९ तर पश्चिम रेल्वे मार्गावर ९९ प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. पश्चिम रेल्वेपेक्षा मध्य रेल्वेवर महिलांचे प्रमाण जास्त आहे.

स्थानक लाइन क्रॉस गाडीतून पडून खांबाला धडकून गॅपमध्ये
कुर्ला २१४ १२१ २ १
ठाणे २0३ ६८ 0 १
डोंबिवली ८७ ८६ 0 0
कल्याण २४६ ७0 0 १
वडाळा १0७ ८६ 0 १
वाशी १0७ ६६ 0 0
मुंबई सेंट्रल ७३ ४५ 0 ७
अंधेरी ८९ ३६ 0 0
बोरिवली १८४ ९७ १ ३
वसई १३४ ७४ २ 0
पालघर ९३ २0 0 0
कुर्ला २१४ १२१ २ १
ठाणे २0३ ६८ 0 १
डोंबिवली ८७ ८६ 0 0
कल्याण २४६ ७0 0 १
वडाळा १0७ ८६ 0 १
वाशी १0७ ६६ 0 0
मुंबई सेंट्रल ७३ ४५ 0 ७
अंधेरी ८९ ३६ 0 0
बोरिवली १८४ ९७ १ ३
वसई १३४ ७४ २ 0
पालघर ९३ २0 0 0

No comments:
Post a Comment