रुग्णालयाची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 February 2014

रुग्णालयाची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करा

मुंबई : विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय आणि जोगेश्‍वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयाची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करा, असे निर्देश महापौर सुनील प्रभू यांनी सोमवारी पालिका प्रशासनाला दिले. त्यांनी सभागृह नेते यशोधर फणसे आणि आमदार डॉ. दीपक सावंत यांच्यासमवेत रुग्णालयाची आकस्मिक पाहणी करून तेथील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला. महापौरांनी रुग्णालयाच्या विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्याकडून प्रलंबित कामांचा आढावा घेतला आणि उरलेली कामे किती दिवसांत पूर्ण होणार याचा अहवाल देण्याच्या सूचना सर्व अधिकार्‍यांना दिल्या. रुग्णालयाच्या लोकार्पण कार्यक्रमासोबतच उर्वरित कामे पूर्ण होणे आवश्यक असताना ती का झाली नाहीत, याचे उत्तर द्या व जबाबदार अधिकार्‍यांवर योग्य ती कारवाई करण्याच्या व प्रलंबित कामे किती दिवसांत पूर्ण करणार याचा आराखडाही देण्याची सूचनाही त्यांनी केली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS