भारत-पाकिस्तान संयुक्त बॅंडला शिवसेनेचा विरोध = पत्रकार परिषदेत राडा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 February 2014

भारत-पाकिस्तान संयुक्त बॅंडला शिवसेनेचा विरोध = पत्रकार परिषदेत राडा


भारत-पाकिस्तान संयुक्त बॅंडला शिवसेनेचा विरोध, पत्रकार परिषदेत राडा

मुंबई- भारत आणि पाकिस्तानमधील कलाकारांच्या संयुक्त बॅंडची घोषणा करणा-या पत्रकार परिषदेत आज शिवसेनेने राडा केला. पाकिस्तानचे कलाकार असलेल्या कोणत्याही बॅंडला अथवा इतर कोणत्याही कार्यक्रमाला आमचा विरोध राहील, असे शिवसैनिकांनी म्हटले आहे. सध्या मुंबईत सुरु असलेल्या काला घोडा फेस्टिव्हलमध्ये भारत-पाकच्या संयुक्त बॅंडचा कार्यक्रम होणार होता.

भारत आणि पाकिस्तान यांच्या संयुक्त बॅंडच्या माध्यमातून दोन्ही देशातील सांस्कृतिक घटकांना एकत्र आणून दोन्ही देशाचे बिघडलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी दोन्ही देशांतील कलाकारांच्या एक संयुक्त बॅंडची संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानुसार एक संयुक्त बॅंडही तयार केला. त्याबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात होती. मात्र, शिवसेनेला याची चाहुल लागली होती. आज दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास मुंबईच्या प्रेसक्लबमध्ये या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पत्रकार परिषदेला सुरुवात होताच दबा धरून बसलेल्या शिवसैनिकांनी पत्रकार परिषदेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच तेथे पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. मुंबई आणि आमच्या देशावर हल्ला करणा-या पाकिस्तानच्या कलाकारांना मुंबईतच नव्हे तर देशभर काम करण्यास आमचा विरोध राहिल अशी भूमिका सेनेनी घेतली आहे. 

शिवसेनेच्या दुट्टपी भूमिकेचा जाहीर निषेध - जितेंद्र आव्हाड
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर दाऊदचा व्याही पाकिस्थानी माजी क्रिकेटर जावेद मियांदाद याचा पाहुणचार केला. त्यावेळी उध्दव ठाकरे राज ठाकरे हे पण उपस्थित होते. कला, क्रीडा, साहित्य यांना सीमेचे कोणतेही बंधन नसते. पण शिवसेनेची आता अस्तित्वाची लढाई सुरु असल्याने शिवबंधन सारखे प्रकार आणून आज तर इंडो-पाक कलाकारांची पत्रकार परिषद शिवसैनिकांनी उधळल्याने या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
 
या घटनेने भारताची आंतरराष्ट्रीय स्थरावर प्रतिमा मलीन झाली आहे. कला साहित्य यांना राजकीय रंग देऊन त्याचे राजकारण करणे लांच्छनास्पद आहे. शिवसेनेने या गोष्टीचे राजकारण करायला नाही पाहिजे. हिटलरशाहीचे हे पालनकर्ते भारतामधून संगीत साहित्य यांच्या पोटी असलेले प्रेम कधीही नष्ट करू शकत नाहीत. साहित्य कला आणि संगीताच्या माध्यमातून माणसे व देश जोडण्याची प्रक्रिया सुरूच राहील. आम्ही नेहमी जोडण्याचे राजकारण केले तोडण्याचे नाही. जे कोणी तोडण्याचे राजकारण करतात त्यांना कधीही यश मिळणार नाही, अशी टीकाही आव्हाड यांनी सेनेवर केली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS