बेस्टच्या अर्थसंकल्पात 143 कोटींचा फरक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टच्या अर्थसंकल्पात 143 कोटींचा फरक

Share This
मुंबई - आधीच तोट्यात असलेल्या बेस्टच्या यंदाच्या अर्थसंकल्पात 143 कोटींहून अधिक रुपयांचा फरक आला असल्याची गंभीर बाब आज बेस्ट समितीच्या निदर्शनास आली. बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी हा फरक मान्य केला आहे. बेस्टची आर्थिक स्थिती बिकट असताना अशा पद्धतीने फरक आल्याबद्दल सदस्यांनी चिंता व्यक्त केली. 

बेस्टचे शिवसेनेचे सदस्य सुनील गणाचार्य यांनीही वाढत्या फरकाबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, की बेस्टच्या परिवहन विभागाच्या कर्जावरील व्याजापोटी 23 कोटी आणि विद्युत विभागाच्या व्याजापोटी 18 कोटी द्यावे लागत आहेत. ठोकताळे बदलण्याची गरज आहे. गेल्या अनुदानाच्या ठोकताळ्यातून शिकण्याची गरज आहे. बेस्टच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना दिली जाते; परंतु अधिकारी प्रत्युत्तर देत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. बेस्ट संकटात असताना पालिकेने बेस्टला अधिक सहाय्य करावे, अशी मागणी कॉंग्रेसचे शिवजी सिंह यांनी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages