सांगली : आपल्या विनोदाने दु:खी माणसाच्या चेहर्यावर हास्य फुलवणारे तमाशा कलावंत काळू-बाळू यांनी कवलापूरसह सांगलीचे नाव राज्यात प्रसिद्ध केले आहे. बाळू यांचे नुकतेच निधन झाले. काळू यापूर्वीच गेले आहेत. या दोघांच्या स्मरणार्थ शासन व जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी मिळून कवलापूर व सांगली येथे त्यांचे यथोचित स्मारक व लोकनाट्य तमाशा ट्रेनिंग सेंटर उभारावे, यासाठी शासनाने तीन ते चार कोटींची मदत द्यावी, अशी मागणी करून आपल्या खासदार फंडातून यासाठी २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा खा. रामदास आठवले यांनी केली.
ज्येष्ठ तमाशा कलावंत बाळू ऊर्फ अंकुश खाडे यांचे नुकतेच निधन झाले. आठवले यांनी मंगळवारी कवलापूर येथे त्यांच्या राहत्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, काळू-बाळू यांची आठ घरे या ठिकाणी आहेत. त्या सर्वांना शासनाने घरकुल योजनेतून घरे द्यावीत, यासाठी आपण जिल्हाधिकारी व समाजकल्याण अधिकार्यांशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांना याबाबत भेटणार आहे. तसेच या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शासनाने त्यांना प्रत्येकी पाच एकर शेतजमीन द्यावी, अशी मागणीही आपण सरकारकडे करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. काळू-बाळू यांचे एक स्मारक त्यांच्या गावी कवलापूर येथे उभारावे तसेच त्यांच्या स्मरणार्थ सांगलीत लोकनाट्य तमाशा ट्रेनिंग सेंटर सुरू करावे. यासाठी शासनाने तीन ते चार कोटींचा निधी द्यावा तसेच जिल्ह्यातील सहकारी संस्थांनाही मदत करावी, असे सांगून आपल्या खासदार फंडातून या नियोजित स्मारकासाठी आपण २५ लाखांचा निधी देऊ, अशी घोषणा करून हे स्मारक व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री आर. आर.पाटील, पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.