25 टक्‍क्‍यांतील प्रवेशासाठी मुदतवाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

25 टक्‍क्‍यांतील प्रवेशासाठी मुदतवाढ

Share This
मुंबई - खासगी प्राथमिक शाळांमधील आर्थिक आणि सामाजिक दुर्बल घटकांसाठीच्या ऑनलाईन प्रवेश अर्जांसाठी 5 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या शिक्षणाधिकारी शांभवी जोगी यांनी दिली. यापूर्वी ती 30 एप्रिलपर्यंत होती. पालकांच्या मागणीमुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

खासगी शाळांमधील 25 टक्के आरक्षणातील प्रवेशासाठी आतापर्यंत चार हजार 991 ऑनलाईन अर्ज आले आहेत. या प्रवेशासाठी आवश्‍यक उत्पन्नाचे दाखले अनेकांना मिळालेले नाहीत. काही ठिकाणी उदाहरणार्थ "के' पश्‍चिममधील अनेक शाळा, मालवणी आणि तुर्भे येथील काही शाळांमध्ये पालकांना प्रवेश हवे आहेत. या भागातल्या पालकांनीही मुदतवाढीची मागणी केली होती. त्यामुळे पालिकेने आयुक्तांशी चर्चा करून हा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. या सर्व अर्जांची पडताळणी झाल्यानंतर लॉटरी काढली जाईल. त्यात दोन याद्या जाहीर होतील. नंतर ऑफलाईन प्रवेश होतील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages