मुंबई - पश्चिम रेल्वे सेवेला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने नुकत्याच झालेल्या 59 व्या रेल्वे सप्ताहामध्ये पश्चिम रेल्वेच्या विशेष पोस्टल कव्हरचे प्रकाशन करण्यात आले. मुंबई परिमंडळाचे पोस्ट मास्टर जनरल हरीश अग्रवाल व पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक हेमंत कुमार यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी विशेष पोस्टल कव्हरचा अल्बम हेमंत कुमार यांना प्रदान करण्यात आला.
या वेळी पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन, पश्चिम रेल्वेचे मुख्य कार्मिक अधिकारी संजय सुरी उपस्थित होते. मुंबईच्या पश्चिम मार्गावर 28 नोव्हेंबर 1864 ला पहिली गाडी चालवण्यात आली होती. या मार्गामुळे मुंबईचा गुजरात आणि उत्तर भारताशी संपर्क प्रस्थापित झाला. देशाच्या विकासाच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण घटना असल्याने या घटनेला 150 वर्षे पूर्ण झाल्याने विशेष पोस्टल कव्हर प्रकाशित करण्यात आले.