मुंबई - लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यापासून बुधवारपर्यंत राज्यात आचारसंहितेचा भंग केल्याचे 525 गुन्हे नोंदवले गेले आहेत. सर्वाधिक 156 गुन्हे पुणे महसूल विभागात नोंदवले गेले आहेत. एकूण गुन्ह्यांपैकी 75 टक्के इतके गुन्हे सभेची वा सभेसाठी जागेची परवानगी न घेतल्याबद्दल, संमतीविना पोस्टर चिकटवल्याबद्दल, प्रचाराचा खर्च वेळेत न कळवल्याबद्दलचे आहेत. निवडणूक आयोगाने यंदा अत्यंत काटेकोरपणे काम केल्याने केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाले.
आयोगाच्या भरारी पथकाने आतापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी धरपकड, झडती, वाहनांची चौकशी केल्याने बेहिशेबी पैसा, विदेशी चलन, मद्याचा साठा मोठ्या प्रमाणावर सापडला आहे. आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या ताब्यात 33 कोटी रुपये इतकी रक्कम पडून आहे. या रकमेची योग्य खातरजमा करण्याची कारवाई सुरू आहे. त्यानंतर ती रक्कम संबंधितांना परत देण्यात येणार आहे.
राज्यात आचारसंहिताभंगाचे 525 गुन्हे नोंद झाले असून, 24 एप्रिलपर्यंत त्यात वाढ होऊ शकते. पुणे विभागात 156, औरंगाबाद विभागात 107, अमरावतीमध्ये 46, नाशिक विभागात 41, तर कोकणात 37 इतके गुन्हे नोंदवले गेले. आयोगाने नेमलेल्या भरारी पथकांकडून ही कारवाई सुरू आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत ही कारवाई अधिक असल्याचे आयोगातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.