मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आज मुंबई शहर परिसरात केलेल्या धडक कारवाईत 67 हजार 600 रुपये किमतीचा बेकायदा उंची मद्यसाठा हस्तगत केला. क्रॉफर्ड मार्केटजवळील कर्नाक रोडच्या पदपथावरून संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या दोघांकडून हा साठा मिळाला. या प्रकरणी दोघांसह हे मद्य पुरविणाऱ्या त्यांच्या साथीदारालाही अटक केली.
राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, मुंबई-ठाण्यासह उत्तर महाराष्ट्रात 24 एप्रिल रोजी मतदान होत आहे. काही दिवसांत राज्यातील विविध ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाने लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान जवळ येत असल्याने विभागाने आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे. विशेषतः मुंबई-ठाण्यात अवैध दारूसाठ्याची आवक होण्याची शक्यता असल्याने उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संचालक प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुभाष जाधव, रमेश पगारे, दुय्यम निरीक्षक विनय शिर्के, संतोष चोपडेकर, जवान अमोल हिप्परकर, प्रभुल्ल भोजने व दीपक पाटील यांनी ही कारवाई केली.