मोदींविषयीचा चित्रपट भाजपने दाखविला मोफत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोदींविषयीचा चित्रपट भाजपने दाखविला मोफत

Share This
मुंबई - घाटकोपरमधील "नीलयोग मॉल'मधील चित्रपटगृहात काल (ता. 15) दाखविण्यात आलेल्या "नमो...नमो' या चित्रपटाला राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. भाजपने स्वखर्चाने हा चित्रपट दाखविला असल्याचे सांगत राष्ट्रवादीने आचारसंहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

भाजप महायुतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले नरेंद्र मोदी यांचे गोडवे गाणाऱ्या या चित्रपटाचा "प्रीमियर शो' काल घाटकोपरमध्ये झाला. "प्रीमियर शो'च्या नावाखाली तिकिटेही मोफत देण्यात आली. या वेळी भाजपचे आमदार प्रकाश मेहताही उपस्थित होते. अशाप्रकारे चित्रपट दाखवित असल्याचे समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाजवळ जमून निषेध करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. निवडणुकीच्या तोंडावर अशाप्रकारे मोफत चित्रपट दाखविणे हा आचारसंहिता भंगाचा गुन्हा आहे. याविरोधात स्थानिक कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, असे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages