मुंबई - लोकसंख्येच्या घनतेनुसार शहरात आणखी 67 नवीन अग्निशमन केंद्रे तयार करावीत, अशा मागणीचा प्रस्ताव मुंबई अग्निशमन दलाने महापालिकेला दिला आहे. शहरात सध्या 33 अग्निशमन केंद्रे आहेत.
आगीच्या ठिकाणी पोहचण्यासाठी दिवसा सरासरी 10 मिनिटे; तर रात्री किमान तीन मिनिटे लागतात. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कमीत कमी वेळेत पोहोचता यावे यासाठी केंद्रांची सख्या वाढवण्याची गरज असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. यात बीट स्टेशनचाही समावेश आहे. शहराचा विस्तार आणि रचना पाहता किमान शंभर केंद्रांची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. हे दल अधिक सक्षम करण्यावरही त्यात भर दिला आहे. पहिल्या टप्प्यात 26 केंद्रे आणि 13 बीट निर्मितीचा प्रस्ताव आहे, अशी माहिती अग्निशमन दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सध्या आपत्कालीन स्थितीत आम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, असे त्यांनी सांगितले.

दिवसा आगीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कधी कधी अर्धा तास लागतो. शहराच्या अनेक भागांत सध्या 7 ते 10 कि.मी. अंतरावर एक फायर स्टेशन आहे. शहरातील गगनचुंबी इमारती हे आणखी एक मोठे आव्हान आहे. त्यासाठी फायर चेक फ्लोअरची संकल्पना राबवली जात आहे. सात मजल्यांपेक्षा उंच इमारतींमधील आग विझवण्याचे प्रशिक्षण जवानांना दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील काचेच्या इमारती हेही आणखी एक आव्हान आहे. भौगोलिक स्थितीनुसार शहरातील उंच इमारतींसाठी पाच बेसमेंटची परवानगी दिली जाते. शिवाय उंच इमारतींमध्ये अग्निशमन व इतर यंत्रणांची पूर्तता करणे बंधनकारक केले असल्याची माहिती त्यांनी दिली.