मध्य रेल्वेच्या स्थानकांवर एटीएम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मध्य रेल्वेच्या स्थानकांवर एटीएम

Share This
मुंबई : घाईघाईत एटीएममधून पैसे काढायचे म्हटले की सर्वात आधी एटीएम शोधावे लागते. उपनगरी रेल्वेच्या अनेक स्थानकांवर एटीएमची सोयच नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने आपल्या ३८ रेल्वे स्थानकांवर ८३ एटीएम (ऑटोमॅटिक टेलर मशीन) लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांचा फायदा तर होणारच आहे, शिवाय मध्य रेल्वेला ४४ कोटी ७७ लाख ८ हजार ७६१ रुपये एवढे आर्थिक उत्पन्नही मिळणार आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने आपल्या ३८ रेल्वे स्थानकांवर विविध बँकांची एटीएम लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अँक्सिस, येस, कोटक महिंद्रा, बँक ऑफ इंडिया या बँकांचा समावेश आहे. या योजनेनुसार कल्याण स्थानकात पूर्वेला ४ तर पश्‍चिमेला २, डोंबिवली स्थानकात ३, कोपर स्थानकात ४, कुर्ला स्थानकात १, मानखुर्द स्थानकात ४, भायखळा स्थानकात ५, दादर स्थानकात २, गोवंडी स्थानकात ३, कलवा स्थानकात २, किंग सर्कल स्थानकात १, घाटकोपर स्थानकात १, भांडुप स्थानकात २, बदलापूर स्थानकात २, आंबिवली, आटगाव आणि आसनगाव स्थानकात प्रत्येकी १, भिवंडी स्थानकात १, सीएसटी स्थानकात ३, कर्जत-कसारा स्थानकात प्रत्येकी १, खडवली स्थानकात आणि खर्डी स्थानकात प्रत्येकी १, मशीद बंदर स्थानकात १, माथेरान स्थानकात १, मुंब्रा स्थानकात ४, नाहूर स्थानकात २, नेरळ स्थानकात १, पनवेल स्थानकात २, परेल स्थानकात २, ठाकुर्ली स्थानकात २, ठाणे स्थानक ात ३, टिळक नगर स्थानकात ३, टिटवाळा स्थानकात २, उल्हासनगर स्थानकात ३, वासिंद स्थानकात १, तर विक्रोळी आणि विद्याविहार स्थानकात प्रत्येकी ४ एटीएम मशीन्स लावण्यात येणार आहेत. त्यापैकी ७ रेल्वे स्थानकांत एटीएम लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकांतच पैसे काढता येणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages