रामदेव बाबांची दुकानदारी उद्ध्वस्त करू - प्रा. कवाडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रामदेव बाबांची दुकानदारी उद्ध्वस्त करू - प्रा. कवाडे

Share This
मुंबई : राहुल गांधी दलितांच्या घरी जाऊन मधुचंद्र साजरा करतात, असे वक्तव्य करून रामदेव बाबांनी दलितांच्या स्वाभिमानास पायदळी तुडवण्याचा केलेला प्रयत्न निषेधार्ह आहे. शासनाने अशा जातिवाचक वक्तव्य करणार्‍या रामदेव बाबांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा त्यांची पतंजली नावाची दुकानदारी उद्ध्वस्त करू व त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिला आहे. रामदेव बाबांनी केलेले हे वक्तव्य दलित अस्मितेबरोबरच राष्ट्रीय अस्मितेचाही अक्षम्य अपराध आहे. रामदेव बाबांच्या आश्रमात जे अनैतिक धंदे चालतात, त्यांची कठोर चौकशी शासनाने करावी, अशी आम्ही मागणी करणार आहोत. रामदेव बाबा ज्या लोकांच्या घरी जातात ते मधुचंद्रासाठीच जात असावेत. आसाराम व रामदेव हे दोघेही मधुचंद्राच्या प्रवृत्तीचे असून दलितांचा अक्षम्य अपराध करणार्‍या रामदेव बाबांना दलित जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कवाडे यांनी दिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages