मुंबई : पालिकेच्या चार मुख्य वैधानिक आणि सहा विशेष समित्यांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीचे सूप वाजल्यानंतर, मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरांमधील एकूण १७ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार आहेत. यासाठी पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि भाजपाचे उमेदवार सोमवारी रात्री उशिरापर्यंत निश्चित झाले नव्हते, तर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी 'फिक्सिंग' केल्याने मनसे या वेळी त्यांचा शब्द पाळणार आहे.
१७ प्रभाग समित्यांसाठी मंगळवारी अर्ज भरण्यात आले असले तरी १९ एप्रिल रोजी एम-पश्चिम विभागाची निवडणूक होणार आहे. १६ एप्रिल रोजी ए, बी, सी, डी आणि ई, एफ-दक्षिण आणि उत्तर, आर-उत्तर, दक्षिण आणि मध्य, जी-दक्षिण या विभागांमध्ये, १७ एप्रिल रोजी जी-उत्तर, एच-पूर्व आणि पश्चिम, के-पूर्व आणि पश्चिम, एम-पूर्व, एल, एन आणि एस आणि टी येथे निवडणूक होणार आहे. १७ पैकी १२ प्रभाग समित्या शिवसेनेला आणि उर्वरित ५ समित्यांवर भाजपाने दावा केला आहे. त्यापैकी सी, डी आणि आर-मध्य या ३ समित्या भाजपाला कोणत्याही परिस्थितीत हव्याच आहेत. मात्र याबाबतचा आणि उमेदवारी कोणाला द्यावी याचा निर्णय शिवसेना आणि भाजपामध्ये रात्री उशिरापर्यंत झाला नव्हता. शिवसेना १२ पैकी एक समिती रिपाइंच्या नगरसेवकाला देणार आहे.
गेल्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 'समझोता'झाला होता. अध्यक्षपद एक वर्ष मनसेकडे, तर यावेळी राष्ट्रवादीकडे असा 'फॉर्म्युला'निश्चित झाला होता. त्यानुसार जी-उत्तरमध्ये काँग्रेसचा आणि जी-दक्षिणमध्ये राष्ट्रवादीचा, एस आणि टी व एन समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक 'अध्यक्ष'पदाच्या मखरात विराजमान होणार आहे. जी-उत्तरमध्ये मनसेचे ५ आणि काँग्रेसचा १, जी-दक्षिणमध्ये मनसेचे ३ आणि २ एनसीपीचे, एस आणि टीमध्ये मनसेचे ५, राष्ट्रवादी ३ व एक काँग्रेसचा आणि 'एन'मध्ये मनसे आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी ३ व एक काँग्रेसचा नगरसेवक आहे.