‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अलौकिक कार्यातून भावी पिढीसाठी प्रेरणा दिली आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र देणाऱया डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेची निर्मिती करुन बळकट लोकशाहीचा पाया उभा केला. जागतिक महासत्ता म्हणून वाटचाल करीत असलेल्या भारताला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तत्त्वे निश्चितच मार्गदर्शक आहेत, असे विचार मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी मांडले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी समस्त मुंबईकरांतर्फे मध्यरात्री १२.०० वाजता (दिनांक १४ एप्रिल, २०१४) पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली, यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री व आमदार चंद्रकांत हंडोरे, आमदार नवाब मलिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
चैत्यभूमीवरही अभिवादनः
मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी आज (दिनांक १४ एप्रिल, २०१४) दुपारी दादर येथील चैत्यभूमी (स्मारक) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आणि ज्योत प्रज्वलित करुन आदरांजली अर्पण केली.