फी वाढी विरोधात विद्यार्थी संघटनांची निदर्शनं - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फी वाढी विरोधात विद्यार्थी संघटनांची निदर्शनं

Share This
मुंबई विद्यापीठाबाहेर आज विद्यार्थी भारती व प्रहार या संघटनांनी जोरदार निदर्शनं केली. शिक्षण शुल्क समितीच्या २५ टक्के फी वाढीच्या प्रस्तावाला विरोध करत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, युवासेना आणि विद्यार्थी सेनेने या सर्व विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन प्रस्तावित फी वाढीविरोधात विद्यापीठाबाहेर आंदोलन केलं. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या फोर्टमधील सभागृहात मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत फी वाढीवर तूर्तास चर्चा होणार नाही, असं आश्वासन कुलगुरु राजन वेळूकर यांनी दिलं आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages