दहा लाख मुंबईकरांची मतदानाकडे पाठ? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दहा लाख मुंबईकरांची मतदानाकडे पाठ?

Share This
मुंबई: मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांमध्ये 24 एप्रिल रोजी मतदान होत आहे. पण मुलाबाळांच्या परीक्षा आटोपल्यामुळे चाकरमान्यांनी आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. त्यामुळे बहुतेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे धाबे दणाणले असल्याचं चित्र आहे.
मतदानाकडे पाठ फिरवून आपापल्या गावी किंवा बाहेरगावी जाण्याचा बेत आखलेल्या मुंबईकरांची संख्या ही दहा लाखांच्या घरात जाते. रेल्वेने परगावी जात असलेल्या मुंबईकरांची संख्या सहा लाखांच्या आसपास आहे. खाजगी किंवा एसटी बसने दोन-सव्वा दोन लाख मुंबईकर फिरतीवर निघतील. तितक्याच संख्येने म्हणजे दोन-अडीच लाख मुंबईकर खाजगी वाहनाने बाहेरगावाच्या दिशेने निघतील.
एकीकडे आयफा पुरस्कारांच्या निमित्ताने अनेक कलाकार अमेरिकेला जाणार आहेत. आता सामान्य मुंबईकरही मतदानाकडे पाठ फिरवून सुट्ट्यांसाठी बाहेरगावी जाण्याच्या तयारीत आहेत. आधीच मुंबईत मतदानाची टक्केवारी कमी त्यात आता चाकरमान्यांनी सुट्टीचा बेत आखल्याने यंदाही मतदान कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages