मुंबई / अजेयकुमार जाधव
१६ व्या लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील १४० उमेदवारांपैकी १६ टक्के म्हणजेच २३ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती अग्नी मुंबई वोट्स डॉट कॉम या संस्थांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांनी अर्ज भरताना दिलेल्या शपतपत्रामधून हि माहिती संकलित करण्यात आली आहे. १४० उमेदवारांपैकी १८ उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये काँग्रेसचा ५ पैकी १, शिवसेनेचे ४ पैकी २, आपचा ७ पैकी १, मनसेचे ३ पैकी २, तर भाजपचे ३ पैकी २ उमेदवारांचा समावेश आहे. या १८ उमेदवारांवर ५ वर्षांपेक्षा जास्त सजा होईल असे, अजामीनपात्र, खून,किडन्याप, बलात्कार करणे, तसेच लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत.
लोकप्रतिनिधींवर असलेया केसेस लवकर निकाली काढाव्यात असे आदेश नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार निवडून आले व त्यांना कोर्टाने सजा सुनावल्यास त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल यामुळे जनतेचा पैसा वय जाणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
लोकसभा लढवणाऱ्या १४० उमेदवारांपैकी ५६ उमेदवार करोडपती आहेत. काँग्रेसचे ५, भाजपचे ३, राष्टवादीचे २, शिवसेनेचे ४, आप्चे ६ उमेदवार करोडपती आहेत. १४० पैकी ४८उमेदवारांनी इन्कम ट्याक्स बाबतची माहिती दिलेली नाही. तर ७ उमेदवारांनी प्यानकार्ड बद्दल माहिती दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

