मुंबई / अजेयकुमार जाधव ( http://jpnnews.webs.com http://jpnnews1.blogspot.in )
शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणारे मुंबई महानगर पालिकेमधील माजी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी २०१२ मध्ये पालिकेची निवडणूक लढवताना शपथपत्रात खोटी माहिती माहिती दिली आहे. शपथपत्रात खोटी माहिती दिल्याने राहुल शेवाळे यांच्यावर कायदेशीर कारवाही करून शेवाळे यांचे नगरसेवकपद रद्द करावे अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी निवडणूक आयुक्त व पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
राहुले शेवाळे यांनी फेब्रुवारी २०१२ मध्ये मुंबई महानगर पालिकेची निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांच्यावर आरसीएफ पोलिस ठाण्यामध्ये ३४/२०१० या क्रमांकानुसार एफआयआर दाखल होता. याबाबत कुर्ला कोर्ट येथील ५२ व्या न्यायालयात १५६१/पीडब्लु/२०१० दिनांक ७/१०/२०१० हि केस सुरु होती. कोर्टामध्ये केस सुरु असतानाही शेवाळे यांनी या गुन्ह्याची माहिती शपथपत्रात लपवली होती.
शेवाळे यांच्या नावे आयसीआयसीआय प्रूडेन्शिअल लाईफ एन्सुरन्सची ३/७/२००७ मध्ये (पॉलीसी क्रमांक ०५६०२२२१) रुपये ४ लाख, त्यांच्या पत्नीच्या नावे (पॉलीसी क्रमांक ०५६०२०३२)रुपये ३ लाख, दिनांक १९/१/२०१२ रोजीची (पॉलीसी क्रमांक १६३१८५०७) रुपये १ लाख, तसेच एचडीएफसीची मुलांच्या नावावर डिसेंबर २००६ मध्ये घेतलेली १ लाख २० हजार रुपयांची पॉलिसी असताना शेवाळे यांनी या पॉलीसीची माहिती शपतपत्रात दिलेली नाही.
शेवाळे यांनी फेब्रुवर २०१२ मध्ये पालिकेची निवडणूक लढवताना आपल्यावर असलेल्या गुन्ह्याची तसेच लाईफ एन्सुरन्समध्ये केलेल्या गुंतवणुकीची माहिती निवडणूक आयोग व लोकांपासून लपवली असल्याने शेवाळे यांच्यावर निवडणूक आयुक्त व पालिका आयुक्तांनी कायदेशीर कारवाही करून शेवाळे यांचे नगरसेवकपद रद्द करावे अशी मागणी पारगावकर यांनी केली आहे.
राहुल शेवाळे यांच्यावर २०१२ मध्ये कारवाही करावी अशी मागणी केली असता निवडणूक आयोगाने कारवाही करण्याचे आदेश पालिकेला दिले होते. परंतु शेवाळे स्थायी समिती अध्यक्ष असल्याने त्यांच्यावर कारवाही करण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. शेवाळे हे पालिकेमध्ये वरिष्ठ पदावर असल्याने त्यांच्यावर कारवाही करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पालिकेमधील अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाही करण्याची मागणी पारगावकर यांनी केली आहे.





.jpg)

.jpg)
