शेवाळे, गायकवाड, बाळकृष्णन यांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शेवाळे, गायकवाड, बाळकृष्णन यांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
दक्षिण मध्य मुंबई मधून लोकसभेची निवडणूक लढवणारे काँग्रेसचे एकनाथ गायकवाड, शिवसेनेचे राहुल शेवाळे व सुंदर बाळकृष्णन यांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चात तफावत आढळल्याने या तिघांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. 

निवडणुकीचे अर्ज भरताना सर्व उमेदवारांना रजिस्टर दिले आहे, हे रजिस्टर कसे भरावे याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या तसेच पत्र सुद्धा देण्यात आले आहे. या तीन उमेदवारांनी सादर केलेला खर्च व अभिरूपी तपासणी नोंदवहीत नोंदविलेला खर्च यात तफावत आढळलेली असल्याने तीन दिवसात स्पष्टीकरण करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या नियम ७७ अन्वये खर्चाबाबतची माहिती सदर करणे बंधनकारक आहे. उमेदवारांना नोटीस मिळाल्यापासून ४८ तासात खर्चाबाबतची माहिती तपासणीसाठी सादर न केल्यास त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १७१ - आय अन्वये न्यायालयात गुन्हा दाखल करून कारवाही केली जाईल अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages