मेधा पाटकर यांच्याविरोधात तक्रार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मेधा पाटकर यांच्याविरोधात तक्रार

Share This
मुंबई - उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या उमेदवार मेधा पाटकर यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी माहिती लपवली असल्याचा आरोप यात केला आहे."नॅशनल कॉन्सिल फॉर सिव्हील लिबर्टी' या संघटनेचे व्ही. के. सक्‍सेना यांनी ही तक्रार दाखल केली. न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याबद्दल "नर्मदा बचाव' आंदोलनाला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. पाटकर यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती नमूद केलेली नाही; तसेच इतरही अनेक माहिती लपवली असल्याचा दावा सक्‍सेना यांनी केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages