मुंबई : गेल्या ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता मुंबईकरांच्या सेवेत शुक्रवारी दाखल करण्यात आला. पूर्व-पश्चिम रस्ते वाहतुकीसाठी या जोडरस्त्याचा उपयोग करून घेण्याचा विचार बेस्ट प्रशासनाने केला आहे. हा मार्ग पूर्व मुक्त मार्गाएवढा लांब नसल्याने या मार्गावर जास्तीत जास्त बसेसच्या फेर्या सुरू करण्याचा बेस्टचा मानस आहे. पहिल्या टप्प्यात ३ तर त्यानंतर २0 बसमार्ग या जोडरस्त्यावरून चालवण्यात येणार आहेत.
सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्यामुळे पूर्व व पश्चिम या दोन्ही द्रुतगती महामार्गामधील अंतर खूपच कमी झाले आहे. सांताक्रुझ आणि चेंबूर या दोन उपनगरांना जोडणारे बेस्टचे २0 पेक्षा जास्त मार्ग सध्या खेरवाडी, कलानगर, शीव या मार्गे चालवण्यात येत आहेत. हे अंतर क ापण्यासाठी बेस्टच्या बसेसला सुमारे दीड ते दोन तास लागतात. या नव्या मार्गामुळे हे अंतर फक्त २0 ते २५ मिनिटांत कापता येणार आहे. तसेच त्यामुळे इंधनातही मोठय़ा प्रमाणात बचत होणार आहे.
सध्या सांताक्रुझ ते चेंबूर या दरम्यान प्रामुख्याने ट्रॉम्बे ते यारी रोड (३५५ मार्ग), शास्त्री नगर सांताक्रुझ ते टाटा पॉवर स्टेशन चेंबूर (३५६ र्मया.) आणि अणुशक्ती नगर ते गोरेगाव आगार पश्चिम (३७४ मार्ग) हे तीन मार्ग चालवण्यात येतात. हे तीन मार्ग पहिल्या टप्प्यात नव्या जोडरस्त्यावरून चालू करण्याचा बेस्टचा विचार आहे. मात्र, कलानगर, शीव येथील प्रवाशांना या मार्गाचा वापर करता येणार नाही. त्यामुळे त्या प्रवाशांसाठी काही जागा मार्ग आखण्याचा विचारही बेस्ट प्रशासन करत आहे. त्याचबरोबर बेस्टच्या सध्या सुरू असलेल्या सांताक्रुझ ते मंत्रालय (सांताक्रुझ ते चेंबूर जोडरस्ता व पूर्व मुक्त मार्गे) अशी काही बससेवा सुरू करता येईल का याबाबतही विचार सुरू आहे. सध्या हे अंतर कापण्यासाठी सुमारे अडीच तास लागतात. मात्र या दोन नव्या मार्गांचा वापर केल्यास हे अंतर एक ते दीड तासांत कापणे शक्य होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने २0 बसमार्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे बेस्टला मोठय़ा संख्येने प्रवासी मिळणार असून परिणामी, उत्पन्न वाढीलाही हातभार लागणार आहे.