मुंबई - रस्त्यांच्या अर्धवट राहिलेल्या कामांवरून वारंवार सूचना करूनही मुख्य रस्ते अभियंता स्थायी समितीत हजर राहत नसल्याचे पडसाद आज उमटले. या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपच्या सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर गैरहजर राहण्याची कारणे तपासून कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली.
स्थायी समितीच्या सलग तीन बैठकांमध्ये शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून चर्चा सुरू आहे. अनेक रस्त्यांबाबत कार्यादेश निघूनही काम सुरू होत नसल्याने सदस्यांनी आजच्या बैठकीत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. रस्त्याच्या दुरवस्थेवर उत्तर देण्यासाठी मुख्य रस्ते अभियंता अशोक पवार यांना स्थायी समितीत उपस्थित राहाण्याचे आदेश अध्यक्ष शैलेश फणसे यांनी दिले होते; मात्र तरीही ते उपस्थित राहत नसल्याने आज सत्ताधाऱ्यांनी संताप व्यक्त केला. पवार यांना स्थायी समितीत उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली होती; परंतु ते येतच नसल्याने त्यांच्या गैरहजेरीची कारणे तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली.