२० एप्रिलला तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२० एप्रिलला तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

Share This
पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार, २० एप्रिलला सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण आणि मुलुंडदरम्यान स्लो/सेमी फास्ट मार्गावर सकाळी ११.०३ ते दुपारी ३.५४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक चालेल. या काळात कल्याणवरून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.०९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या सर्व स्लो/सेमी लोकल कल्याण आणि मुलुंडदरम्यान अप फास्ट मार्गावर चालवल्या जातील. या लोकल डोंबिवली आणि ठाणेदरम्यान सर्व स्टेशनवर थांबतील.

सीएसटीवरून सुटणाऱ्या फास्ट लोकल स. १०.०८ ते दु. २.४० वाजेपर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्टेशनदरम्यान थांबतील. डाऊन स्लो लोकल ठाकुर्ली कळवा, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा स्टेशनवर थांबणार नाहीत. या प्रवाशांना अप मार्गावर व्हाया डोंबिवली/कल्याणदरम्यान प्रवास करता येईल.

पनवेल आणि नेरूळ अप आणि डाऊन मार्गांवर स. ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात पनवेलवरून सीएसटीसाठी सुटणाऱ्या अप मार्गांवरील लोकलसेवा स. १०.४३ ते दुपारी ३.२७ वाजेपर्यंत पनवेल आणि नेरूळदरम्यान खंडीत करण्यात आली आहे. डाऊन मार्गावर नेरूळवरून सुटणाऱ्या लोकलसेवा स. १०.४१ ते दुपारी ३.१७ या वेळेत नेरूळ आणि पनवेलदरम्यान खंडीत करण्यात येणार आहेत. या काळात बदलापूर आणि कर्जतदरम्यान शटल सेवा चालवण्यात येणार आहे.

अप ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेलवरून सुटणाऱ्या लोकलसेवा स. ११.०५ ते दु. ३.१९ या वेळेत पनवेल आणि नेरूळदरम्यान खंडीत करण्यात आली आहे. डाऊन मार्गावर ठाण्यावरून स. ११.४२ ते दु. २.४८ या वेळेत सुटणाऱ्या लोकलसेवा नेरूळ आणि पनवेलदरम्यान खंडीत करण्यात आली आहे. पनवेल-अंधेरी लोकल मेगाब्लॉक काळात खंडीत करण्यात आली आहे. या काळात सीएसटी-नेरूळ आणि ठाणे-नेरूळदरम्यान विशेष सेवा चालवण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर रविवार, २० एप्रिल रोजी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रलदरम्यान स. १०.३५ ते दु. ३.३५ या वेळेत अप आणि डाऊन फास्ट मार्गांवर मेगाब्लॉकचे काम चालेल. त्या काळात या लोकल स्लो मार्गावर वळवण्यात येतील. काही लोकल रद्द करण्यात येतील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages