पालिका शाळेत इंटरनेट सुविधा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका शाळेत इंटरनेट सुविधा

Share This
मुंबई - पालिका शाळांना इंटरनेट सुविधा पुरवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी 46 लाख रुपयांची तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यानुसार पालिका शाळांमधील एका संगणकाला इंटरनेटची जोडणी दिली जाणार आहे.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत पालिकेच्या 143 शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक प्रयोगशाळेत पाच संगणक आहेत; मात्र इंटरनेटअभावी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. यावर उपाय म्हणून पालिकेने किमान एका संगणकाला इंटरनेटची जोडणी देण्यास सुरुवात केली आहे.
शाळा होणार हिरव्यागारराष्ट्रवादी कॉंग्रसेच्या डॉ. सईदा खान यांनी पालिका शाळांच्या परिसरात झाडे लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे. 506 शाळांना मैदाने आहेत. त्यांच्याभोवती चांगली झाडे लावता येतील, असे या प्रस्तावात म्हटले आहे. हा प्रस्ताव शिक्षण समितीच्या पुढील बैठकीत मांडण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages