भाजपाकडून शिवसेनेचा विश्‍वासघात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजपाकडून शिवसेनेचा विश्‍वासघात

Share This
मुंबई : महापालिकेच्या एन प्रभाग समितीच्या अध्यक्षपदावर शिवसेनेने भाजपाकडे दावा केला होता, मात्र भाजपाच्या नेत्यांनी खूपच आग्रह केल्यामुळे शिवसेनेने ही 'सीट' त्यांना दिली. मात्र त्यांच्या उमेदवार रितू तावडे यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेऊन शिवसेनेला दगा दिला, अशा शब्दांत पालिकेतील सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी आपला रोष व्यक्त केला. 

भाजपाच्या नेत्यांनाही तावडे यामागील कारण सांगण्यास तयार नाहीत, हे सर्वस्वी चुकीचे आहे. यामुळे भाजपाच्या पालिकेतील नेत्यांसमवेत आपण शनिवारी चर्चा करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. तावडे यांनी आयत्यावेळी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे हारूण शेख बिनविरोध निवडून आले, याचा राग शिवसेनेत धुमसत आहे. शिवसेना-भाजपा आणि रिपाइं या महायुतीच्या नगरसेवकांचे संख्याबळ कमी असले तरी निवडणूक बिनविरोध होता कामा नये, याबद्दल शिवसेना आणि भाजपामध्ये एकमत झाले असताना तावडे यांनी अचानक निवडणूक रिंगणातून माघार घेतल्यामुळे सर्व फियास्को झाला, अशी चर्चा उभय पक्षांच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. या घटनेनंतर विश्‍वासराव यांनी पटेल यांच्याशी संपर्क साधून तावडे यांनी अचानक माघार घेण्याचे कारण विचारले असता, 'मलाही तावडे यांनी कारण सांगितले नसून याबद्दल त्या काही बोलण्यास तयार नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. माघार घेण्याच्या सूचना वा आदेश मी दिलेले नाहीत, असेही पटेल यांनी विश्‍वासराव यांच्याकडे स्पष्ट केले. मात्र तावडेंवर कारवाई झाली पाहिजे, अशी चर्चा शिवसेनेत सुरू आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages