मुंबई - आग आटोक्यात आणताना पाणी कमी पडल्यास वापर करता यावा या उद्देशाने ब्रिटिश काळापासून रस्त्यावर हायड्रन्ट लावण्यात आले. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ते आता नामशेष होऊ लागले आहेत. महापालिका प्रशासन आणि कंत्राटदाराच्या "कृपे'ने उरलेसुरले हायड्रन्टही पदपथाखाली गाडले जात आहेत.
काही वर्षांपूर्वी मुंबईत 10 हजार 850 हायड्रन्ट अस्तित्वात होते. त्यापैकी सध्या फक्त एक हजार 353 हायड्रन्ट चालू स्थितीत आहेत. महापालिकेच्या 2014-15 च्या अर्थसंकल्पावर स्थायी समितीत चर्चा सुरू असताना दुर्लक्षित हायड्रन्ट सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण नेहमीप्रमाणेच हे आश्वासनही हवेतच विरले. या चर्चेनंतर काही महिन्यांत मेट्रो सिनेमा जंक्शनपासून काळबादेवीकडे जाणाऱ्या पदपथाची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले. तेथे असलेले हायड्रन्ट नव्या पदपथाखाली गाडले जात आहेत.

अग्निशमन दलाकडे सध्या मोठ्या क्षमतेचे पाण्याचे टॅंकर असताना हायड्रन्टची गरज काय, असा सवाल विचारला जात आहे. पण, अनेक वेळा वाहतूक कोंडी आणि अरुंद जागा यांच्यामुळे टॅंकर घटनास्थळी पोहचू शकत नाहीत. अशा वेळी पाण्याची गरज भागवण्यासाठी हायड्रन्टचा वापर करता येऊ शकतो.