भुसावळ / सावदा - भारतीय राज्यघटना बदलणे हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) छुपा अजेंडा आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला शिवसेना, भाजपानेच विरोध केला होता. मात्र, रिपाइंचे नेते खासदार रामदास आठवले यांना या विषयाचा विसर पडलेला दिसतो. म्हणूनच तर ते रेशीमबागेतील बाळासाहेब देवरसांच्या समाधीसमोर लोटांगण घालत आहेत. आठवलेंचे नाव ‘विसरले’ असे असते तर ते त्यांना शोभून दिसले असते, असा टोला गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आठवलेंना लगावला आहे. रविवारी सावदा येथे मनीष जैन यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
गुजरात विकासाचे फसवे मॉडेल नको
धरणगाव । देशात नरेंद्र मोदी यांची नव्हे, तर नरेंद्र मोदींविरोधात लाट आहे. तसेच आम्हाला गुजरात विकासाचे फसवे मॉडेल नको, तर महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरात हवा आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी धरणगावच्या सभेत केले.