मुंबई : उपनगरीय लोकल मार्गावरील प्लॅटफॉर्म आणि लोकल गाडी यांच्यातील दीड फुटांचा गॅप कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने मध्य रेल्वे प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यानुसार मध्य रेल्वे मार्गावरील २४ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम येत्या २ वर्षांत पूर्ण होणार असून त्यासाठी १६ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे हे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. या कामाचा पहिला टप्पा हा मार्च २0१५ ला पूर्ण होणार आहे. त्यामध्ये १२ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात येणार आहे, तर पुढील टप्प्यात मार्च २0१६ पर्यंत उर्वरित १२ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात येणार आहे.
काही महिन्यांपूर्वी घाटकोपर येथे मोनिका मोरे या तरुणीचा लोकलच्या गॅपमध्ये पडून अपघात झाला होता. रिसर्च, डेव्हलपमेंण्ट अँण्ड स्टॅण्डर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ)ला प्लॅटफॉर्मची उंची ९00 मिलीमीटर एवढी करण्याबाबत चाचपणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने मध्य रेल्वे प्रशासनाला ३ वर्षांत प्लॅटफॉर्म आणि लोकलमधील अंतर कमी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार रेल्वे प्रशासनाने काम करण्यास सुरुवात केली असून ७६0 मिमी ते ८४0 मिमी यादरम्यान असलेले सर्व रेल्वे प्लॅटफॉर्म किमान ८२0 मिमीपर्यंत वाढवण्यात येणार आहेत. त्यानंतर मध्य रेल्वेवरील ९ प्लॅटफॉर्मची उंची ९00 मिमीएवढी वाढवली आहे. यापुढील प्लॅटफॉर्मबाबतही अशीच चाचपणी करून त्यानंतर उंची किती वाढवावी याचा विचार करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. रेल्वेने ७४ रेल्वे स्थानकांवरील २४ प्लॅटफॉर्मचे सर्वेक्षण करून या प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे ठरविले आहे. पहिला टप्पा हा मार्च २0१५ला पूर्ण होणार आहे. त्यामध्ये १२ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात येणार आहे, तर पुढील टप्प्यात मार्च २0१६ पर्यंत उर्वरित १२ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात येणार आहे.
प्लॅटफॉर्म उंच होणार
कोपर (प्लॅ. १ व २), घाटकोपर (प्लॅ. १), चेंबूर (प्लॅ. १ व २) सॅण्डहस्र्टरोड (प्लॅ. २), शीव (प्लॅ. २, ३ व ४), ठाणे (प्लॅ. ७), रे रोड (प्लॅ. २), कांजूर मार्ग (प्लॅ. १), कॉटनग्रीन (प्लॅ. २), वडाळा (प्लॅ. १).