परेवर ५९ वा रेल सप्ताह उत्साहात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

परेवर ५९ वा रेल सप्ताह उत्साहात

Share This


मुंबई : पश्‍चिम रेल्वे मार्गावर ५९वा रेल सप्ताह पुरस्कार समारोह सोमवार, २१ एप्रिल रोजी पार पडला. २0१३-१४ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणारी समग्र कुशलता ही शिल्ड रतलाम विभागाला परेचे महाव्यवस्थापक हेंमत कुमार यांच्या हस्ते देण्यात आली. या वेळी ११0 व्यक्तिगत आणि १२ सामूहिक पुरस्कार देण्यात आले.

मुंबई सेंट्रल विभागाने लेखा विभागामध्ये उत्कृष्ट निष्पादनासाठी दक्षता शिल्ड प्राप्त केली. यांत्रिक विभागासाठी देण्यात येणारी शिल्ड मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद यांनी संयुक्तरीत्या प्राप्त केली. मुंबई विभागाच्या वांद्रे टर्मिनस येथील कोंचिग डेपोला सर्वश्रेष्ठ अनुरक्षित मेल-एक्स्प्रेस ट्रेन म्हणजेच पश्‍चिम एक्स्प्रेससाठी प्रथम पुरस्कार देण्यात आला. या वेळी बोलताना पश्‍चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक हेंमत कुमार यांनी रेल्वे कर्मचारी आणि अधिकार्‍यांना ५९ व्या रेल सप्ताहासाठी शुभकामना दिल्या. तसेच पश्‍चिम रेल्वेवर राबवण्यात येणार्‍या विविध योजनांची चर्चा केली. या वेळी पश्‍चिम रेल्वेने १५0 वर्षे पूर्ण केल्यामुळे पश्‍चिम रेल्वे आणि महाराष्ट्र परिमंडलचे पोस्ट मास्टर जनरल हरीश अग्रवाल यांच्या हस्ते एका विशेष पोस्टर कवरचे उद््घाटन करण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages